परभणीतील पाथरीमध्ये रांगोळीतून साकारली छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती
30 तास मेहनत घेत 24 क्विंटल रांगोळीचा वापर करीत 10392 स्केअर फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती
परभणी-19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंती निमित्त परभणी जिल्ह्यातील साईबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या पाथरी येथील देवनांद्रा विद्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक शिवजन्मोउत्सव समिती पाथरी व जीवन कौशल्य आर्टच्या वतीने रांगोळी काढण्यात निपुण असलेल्या ज्ञानेश्वर बर्वे व त्यांच्या 13 कलाकारांनी अविरत 30 तास मेहनत घेत 24 क्विंटल रांगोळीचा वापर करीत 10392 स्केअर फुटाची छत्रपती शिवाजी महाराज यांची शिंहासनावर विराजमान असलेली सुंदर प्रतिकृती बनवण्याचा अनोखा प्रयत्न
बद्दल त्यांचे परभणी जिल्ह्यात कौतुक होत असुन ही छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृत्ती असलेली रांगोळी पाहण्यासाठी शिवप्रेमीनी, नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केल्याचे पाहावयास मिळते.