APALA VIDARBH LIVE
देवानं सानप लोणार
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्यास का विरोध करता म्हणून सिंदखेड राजा ते शिवनेरी काढली रॅली..
भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांची रॅली अडवून घेतलं ताब्यात
विनापरवाना रॅली काढल्याने घेतले ताब्यात
BULDANA SINDKHEDRAJA छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यात त्यांचेच पुतळे गावोगावी बसवण्यास राज्यसरकार का विरोध करते , म्हणून भाजपचे प्रदेश प्रवक्ते यांनी सरकारला धडा शिकवण्यासाठी आज शिवजयंती चा मुहूर्त साधत सिंदखेड राजा ते शिवनेरी अशी रॅली काढली होती.. मात्र रॅली ला सुरुवात झाल्यावर सिंदखेडराजा पोलिसांनी विनापरवाना रॅली का काढली , म्हणून रॅली अडविली आणि प्रवक्ते विनोद वाघ याना बळजबरीने ताब्यात घेतलंय.. तर यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ही बाजूला करत वाघ यांना पोलीस स्टेशन ला घेऊन गेलेय.. मात्र आपण रॅली काढल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा पवित्रा विनोदज वाघ यांनी घेतलाय..