अडीच लाख रुपयांचं सोयाबीन चोरी
वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे अमानी रस्त्यावरील गोदामातून अडीच लाख रुपये किंमतीचं सोयाबीन चोरी झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
शेतकरी प्रमोद नवघरे यांच्या शेतातील गोदामात साठवून ठेवलेले अडीच लाख किमतीचं 35 क्विंटल सोयाबिन चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.चोरीची घटना घडल्यानं पांगरी परिसरात खळबळ उडाली असून मालेगांव पोलीस चोरीचा तपास करीत आहेत.