BULDHANA संभाजी भिडे विरोधात काँग्रेस आक्रमक बुलढाण्यात काँग्रेसचे निषेध आंदोलन - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, July 29, 2023

BULDHANA संभाजी भिडे विरोधात काँग्रेस आक्रमक बुलढाण्यात काँग्रेसचे निषेध आंदोलन


संभाजी भिडे विरोधात काँग्रेस आक्रमक बुलढाण्यात काँग्रेसचे निषेध आंदोलन..

(आपला विदर्भ लाईव्ह देवानंद सानप लोणार बुलढाणा )

महात्मा गांधीं Mahatma Gandhi बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या Sambhaji  संभाजी भिडेला अटक करण्याची काँग्रेसची मागणी संभाजी भिडे Sambhaji Bhide नामक व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत निंदाजनक असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या गृहस्थाला ताबडतोब अटक करा, अशी मागणी करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा रस्त्यावर उतरल्याचे पाहावयास मिळत आहे.यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन पार पडले.

महात्मा गांधी विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संभाजी भिडे विरोधात आज काँग्रेसने बुलढाणा जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात केली आहे. सातत्याने महापुरुषांबद्दल अपशब्द काढणाऱ्या संभाजी भिडे ला सरकार वाचवत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. महात्मा गांधी बद्दल खोटी माहिती पसरवत महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसकडून आता केली जात आहे. 

बुलढाणा जिल्ह्यात ठीक ठिकाणी काँग्रेसकडून संभाजी भिडे यांचा निषेध आंदोलन केली जात आहेत. सरकारने तात्काळ महात्मा गांधीचा अपमान करणाऱ्या, महात्मा गांधी विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संभाजी भिडेंवर कारवाई करून तात्काळ त्यांना अटक करावी अशी मागणी काँग्रेस करताना पाहायला मिळत आहे. शेगावात आज शनिवारी शेगावात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन पार पडले.

Post Top Ad

-->