BULDHANA अतिवृष्टीच्या महापुराने झालेल्या नुकसानाची खासदार व मा.मंत्री यांनी केली पाहणी - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, July 29, 2023

BULDHANA अतिवृष्टीच्या महापुराने झालेल्या नुकसानाची खासदार व मा.मंत्री यांनी केली पाहणी

  खासदार प्रतापरावजी जाधव व माजी मंत्री आ.डॉ.संजय कुटे     
   (APALA VIDARBH LIVE NETWORK)

बुलढाणा आसलगाव,सुनगांव,जामोद,खेर्डा,धानोरा,वडशिंगी आदी गावांमध्ये पुराने बाधित झालेल्या नागरिकांच्या भेटी घेत झालेल्या नुकसानीची शिवसेना नेते खासदार प्रतापरावजी जाधव व माजी मंत्री आ.डॉ.संजय कुटे यांनी पाहणी करून बाधित नागरिकांना धीर दिला.अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीची भरीव मदत मिळावी यासाठी शासन दरबारी भक्कम पाठपुरावा करत असून शेतकरी बांधवांना भरीव मदत मिळावी यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न असणार आहेत. नदी किनाऱ्या वरील अनेक शेतक-यांची शेती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाल्याचे झाले आहे.

झालेल्या नुकसानीचे ८० ते ९० % पंचनामे झाले असून उर्वरित पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना तलाठी व संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे सर्वे करण्यात येत असून त्याचा अहवाल लवकरच शासन दरबारी मांडणार आहे. अतिवृष्टी व महापुराने अतिशय नुकसान झाले असून अनेक संसार यामुळे बाधित झाले आहेत, परिस्थिती अत्यंत भीषण आहे. 

तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतीला सुद्धा याचा फटका बसला आहे. त्यामुळे हे संकट सर्वांसाठीच मोठे संकट ठरले आहे. या नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, यासाठी शासनाकडे खासदार प्रतापरावजी जाधव,आ.डॉ.संजयजी कुटे हे पाठपुरावा करणार आहे.सरकार संवेदनशील सरकार असून  कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी असणारे सरकार आहे. या वेळीसुद्धा त्यांना सर्वकष मदत मिळावी साठी माझे कायम प्रयत्न असणार आहेत.

या अस्मानी संकटातून सावरणे अवघड जरी असले तरी अशक्य नाही.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मा.शांताराम दाणे,उपजिल्हा प्रमुख देविदास घोपे, राजु पाटील मिरगे,संजय अवताडे,शिवसेना ता.प्रमुख अजय पारस्कर,रामा थारकर,राजेंद्र बगे,शहरप्रमुख अरुण ताडे,रमेश भट्टड व शिवसेना भाजपचे प्रमुख पदाधिकारी,जिल्हा प्रशासनाने चे अधिकारी उपस्थित होते.

Post Top Ad

-->