मदन वामन पातुरकर विद्यालयाच्या वतीने विविध प्रबोधनात्मक देखावे सादर करून गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप
बुलडाणा डोणगाव शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र उमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली होती गणेश उत्सवा दरम्यान विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत व्हावा विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना चालना मिळावी या उद्देशाने गणेश उत्सवात दरम्यान दररोज विविध सामाजिक बौद्धिक रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या
आणि आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी विद्यालयाच्या वतीने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला या निमित्ताने गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली गणेश उत्सव मिरवणुकीत विद्यालयाच्या वतीने विविध समाज प्रबोधन पर देखावे सादर केले होते विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन पाणी आडवा पाणी जिरवा. पाण्याचा काटकसरीने वापर. झाडे लावा झाडे जगवा. मोबाईलचे दुष्परिणाम. स्वच्छता अभियान. स्वच्छतेचे महत्व. दिंडी सोहळा. पालखी सोहळा. कावड मंडळ.
ढोल ताशा पथक. थोर महापुरुषची वेशभूषा. खंडेरायाची वरात. मा जिजाऊ ढोल ताशा पथक आदी विविध देखावे सादर करून डोणगाव नगरीतून भव्य दिव्य गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान डोणगाव नगरीतून चौका चौकात रांगोळी सजावट करून गणरायाचे पूजन करण्यात आले
यावेळी विद्यालयाच्या वतीने अप्रतिम देखावे प्रबोधनात्मक वेशभूषा सादर करून जनजागृती केली डोणगाव नगरीतून प्रभात फेरी मार्गाने गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यालयाचे पालक संचालक गोपाल बोरा. सल्लागार सुनील बियानी. राजकुमार सारडा. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र उमाळे सर्व शिक्षक वृंद त्याची तर कर्मचारी उपस्थित होते डोणगाव नगरीतून गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान अप्रतिम देखावे सादर करून जनजागृती केली त्या विविध मान्यवरांनी कौतुक करून विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र उमाळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी. ज्योतीताई बुरखंडे. विलास परमाळे. महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी डोणगाव च्या वतीने सुद्धा सत्कार करून कौतुक केले