स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई पाच आरोपींना ठोकल्या बेड्या. लाखोंचा मुद्देमाल जप्त
डोळ्यात मिरची पावडर फेकून लुटमार करून लाखोंची रक्कम लुटणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद...
बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतील जळगाव जामोद नांदुरा रोडवर एका व्यापाऱ्याची चार चाकी गाडी अडवून त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्या जवळील ३ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता, तर किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील राहेरी पूलावर देखील एका व्यापाऱ्याला अडवून त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्या जवळील ४ लाख ४३ हजार रुपये लुटण्यात आले होते...
याप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यापैकी दोन्ही घटनेतील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन आरोपी सध्या फरार आहेत, यापैकी साडेपाच लाख रुपयांच्या सुमारास मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून दोन्ही घटनेतील आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, त्यांच्यावर ही यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत...
पोलीस स्टेशन नांदुरा अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यात काय आहे जप्त केलेला मुद्देमाल रोख रक्कम 53 हजार 490 रुपये. गुन्ह्यातील चोरून नेलेल्या रकमेतून विकत घेण्यात आलेल्या एक एप्पल मोबाइल 51 हजार रुपये. गुन्ह्यात वापरलेली एक रेसर बाईक किंमत 1 लाख 50 हजार रुपये असा एकूण 2 लाख 54 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला...
पोलीस स्टेशन किनगाव राजा घडलेल्या गुन्ह्यात काय हकीकत :- यातील फिर्यादी नाव विष्णु पंढरीनाथ काकड वय 34 वर्षे रा. किनगांव राजा ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा हे किनगांव राजा येथे असलेल्या टापरे सुपरमार्केट व किराणा या दुकानावर वसुलीच्या कामावर नौकरीस आहेत. ते दि. 19/10/2023 रोजी बिबी, मलकापूर पांग्रा, दुसरबीड येथील सुपर मार्केटची वसूली करुन किनगांव राजा करीता मोटार सायकलने एकटे येत असतांना दुसरबीड ते राहेरीचा पुल या हायवेवर दोन दुचाकीवर सहा इसम मागून येवून फिर्यादीची दुचाकी अडवून, फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून, फिर्यादीस खाली पाडून, त्यास मारहाण करुन, त्याने वसूली करुन आणलेले 4,43,372/-रुपये रुपयाने भरलेली बॅग बळजबरीने हिसकावून पळून गेले.
पोलिसांनी गोपनीय माहितीवरुन गुन्हा उघडकीस आणला आला असून यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपी
(1) बाळू भागाजी मकळे वय 26 वर्षे रा. डॉ. आंबेडकरनगर, ता.जि.छत्रपती संभाजीनगर
(2) रामेश्वर ऊर्फ परश्या अंकुश हिवाळे वय 28 वर्ष रा. मुकुंदवाडी, ता.जि.छत्रपती संभाजीनगर (3) अजय संजय जाधव वय 24 वर्षे रा. सुतगिरणी गारखेडा परिसर, ता.जि.छत्रपती संभाजीनगर.
(4) आकाश प्रभाकर साळवे वय 25 वर्षे रा. मुकुंदवाडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर आरोपी क्र. 01 ते 04 गुन्ह्यात प्रत्यक्ष घटनास्थळी दरोडा टाकणारे आरोपी. (आ.क्र. 01 ते 04 यांना दि.24.10.2023 रोजी अटक करण्यात आलेली असून मा.न्यायालयाने दि 27.10.2023 पावेतो 04 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.)
(५) कैलास गबाप्पा जितकर वय ४४ वर्षे रा. वार्ड नंबर-02, दुसरबीड ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा (६) लक्ष्मी मधुकर बोरुडे वय ४३ वर्षे, रा. पाठेगाव ता. जि. भारतीय संभाजीनगर, आरोपी क्र. 05 व 06 दरोड्याचा कट रचणारे व दरोडा घडवून आणण्यासाठी मदत करणारे (आरोपी क्र. 05 व 06 यांना दि.25.10.2023 रोजी अटक करण्यात आली असून त्यांना मा. न्यायालय यांच्या समक्ष हजर करण्यात येत आहे.)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :- (1) रोख रक्कम- 2,12,900/- रुपये,(2) मोबाईल फोन- ०४(3) दुचाकी वाहने- 02असा एकूण- 3,82,900/-रुपयांचा मुद्देमाल आज पावेतो जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे या कारवाईमुळे गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत..