BULDHANA उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई; bus बस चालकावर Filed a case गुन्हा दाखल - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, October 25, 2023

BULDHANA उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई; bus बस चालकावर Filed a case गुन्हा दाखल


बुलडाणा (जिमाका) दि.25:- समृध्दी महामार्गावर लक्झरी बस चालवित असताना मोबाईलवर चलचित्र पाहतानी व कानात हेडफोन लावून धोकादायक पध्दतीने वाहन चालवित असताना समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लीपवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे. वाहनचालक धनजंय कुमार सिंह यांच्यावर मोटार वाहन कायद्यातील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली. उपलब्ध पाणीसाठाचा वापर काटकसरीने करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, तसेच मोबाईलवर चलचित्र बघणे, कानात हेडफोन घालुन वाहन चालविणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे अपघात होऊ शकतो तसेच ते मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लीपची दखल घेत उप प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन चालकावर पोलिस स्टेशन मेहकर येथे गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. 

वाहन चालविताना मोबाईलवर व्हिडीओ तसेच हेडफोन लावून गाणे ऐकणे किंवा बोलणे मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा असून वाहन चालविताना मोबाईलचा वापर करु नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन विभागाव्दारे करण्यात आले आहे. 

Post Top Ad

-->