प्रशासकांनी मनमानी कारभार न करता करवाढ तात्काळ मागे घ्यावी : प्रणव परिचारक
पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी व पांडुरंग परिवाराचा करवाढीस विरोध
मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाला दिले निवदेन
(APALA VIDARBH LIVE नागेश काळे पंढरपूर)
पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाकडून सध्या शहरातील मालमत्ताधारकांना करवाढ करण्यात आली आहे. सध्या पालिकेत नगरसेवक नसल्याने प्रशासक असणारे अधिकारी मनमानी कारभार करून करवाढ करीत आहेत. याबाबत मा.प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोर्चा काढून नगरपालिका प्रशासनास करवाढ तात्काळ मागे घेण्यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. अशी माहिती युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली.
पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडी पांडुरंग परिवार यांच्या अंतर्गत असणारे सर्व आजी-माजी नगरसेवक भाजपाचे माजी नगरसेवक यांची आज एकत्रित बैठक झाली. प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार या झालेल्या बैठकीत प्रशासनाने तात्काळ करवाढ मागे घ्यावी.असा एकमतने निर्णय झाला. यानंतर युवा नेते प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर मोर्चा काढत, नगरपालिका प्रशासनास करवड तात्काळ रद्द करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
नगरपालिकेच्या सभागृहात सध्या एकही लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लोकांच्या मतांचा आदर न ठेवता केलेली ही करवाढ चुकीची असल्याचे मत सर्व माजी नगरसेवक , नगराध्यक्ष व प्रणव परिचारक यांनी मांडले.
पंढरपूर नगरपरिषदेची नगराध्यक्ष व नगरसेवक यांची मुदत संपलेली असून प्रशासनाने मनमानी कारभार चालवला आहे. पंढरपूर शहरातील विविध मालमत्ता धारकांना कर वाढीची नोटीस घरोघरी, दुकानामध्ये नगरपरिषद प्रशासनाने वाटप केलेली आहे. नगरपरिषदेकडून मालमत्ता धारकांकडून प्रत्येक वर्षी कर गोळा करते. परंतू सन 2023-24 करात वाढ झाल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सदर वाढ करताना कोणालाही विश्वासात घेण्यात आलेले नाही. तसेच कर वाढ करताना याबाबत नगरपरिषद सभागृहात चर्चा होवून वाढ करण्यात येत होती. मात्र सध्या नगराध्यक्ष व नगरसेवक नसल्याने प्रशासनाने मनमानी कारभार केला आहे.
सध्याच्या नगरपालिका प्रशासनाने केलेल्या करवाढ करण्यास परिचारक गट पांडुरंग परिवार आणि पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीने तीव्र विरोध दर्शवला. नगरपालिकेने सर्वे करताना अनेक मालमत्ताची प्रत्यक्ष पाहणी न करता कर आकारणी केलेली दिसून येते. तसेच अनेक मालमत्ता रहिवासी असताना त्यांना व्यवसायीक दराने कर आकारणी केलेली आहे. काही मालमत्ता या रहिवासी असताना त्यांना व्यवसायीक दराने पाणी पट्टी आकारली आहे. मालमत्ता धारक यांच्या मुळ नावामध्ये बदल झालेला दिसून येतो.
यावेळी युवा प्रणव परिचारक यांनी माध्यमांशी बोलताना सातारा नगरपरिषदेने सदर कर आकारणी प्रकीयेस स्थगिती दिल्याबाबत तसेच हरकत अपिलावर सुनावणी घेणे कामी अपीलीय समितीतील सदस्याबाबत माहिती दिली. व लवकरात लवकर तोडगा काढून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा आणि जुलमी वाढीव कर रद्द करावा अशी मागणी केली. अन्यथा मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असल्याचे सांगितले.
यावेळी दि.पंढरपूर अर्बन बॅकेचे चेअरमन, सतिशजी मुळे, मा.नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, नागेश भोसले, पांडुरंग घंटी, रा.पा.कटेकर, मा.पक्षनेते अनिल अभंगराव, गुरूदास अभ्यंकर, मा.नगरसेवक सत्यविजय मोहोळकर, गणेश अधटराव, शहराध्यक्ष विक्रम शिरसट, सोमनाथ डोंबे, निलराज डोंबे, अमोल डोके, दत्तात्रय धोत्रे, सुजीतकुमार सर्वगोड, इब्राहिम बोहरी, मनोज सुरवसे, नवनाथ रानगट, नारायण शिंगण, धर्मराज घोडके, बसवेश्वर देवमारे, विवेक परदेशी, विजय वरपे, शिवाजी अलंकार, कृष्णा वाघमारे, राजु कौलवार, ऋषिकेश उत्पात, गणेश शिंगण, अनंत कटप, श्रीनीवास बोरगावकर, संजय जवंजाळ, सुभाष मस्के, लखन चौगुले, राहुल परचंडे, विनायक संगितराव, अक्षय वाडकर, सुरज राठी, शैलेश बडवे, अरूण मंजरतकर, बाळासाहेब कौलवार, अशोक डोळ, आण्णा ऐतवाडकर, दिपक येळे, मुन्नागीर गोसावी, सचिन कुलकर्णी, लाला पानकर, युवराज मुचलंबे, आबा झेंड, शरद माने, भाऊसाहेब शिंदेनाईक, विजय वाघ, सर्व आजी माजी नगरसेवक, नागरिक, पांडुरंग परिवारातील कार्यकर्त आदि मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.