डोणगाव राज्यभरात होळीचा सण हा अतिशय आनंदात उत्साहात साजरा होत असतो होळी ही फक्त होळी नसून या होळी निमित्त महत्त्वाचा उद्दिष्ट म्हणजेच होळी सणामागील उद्देश दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण असतें, मात्र बुलडाणा जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथील लोळी या पवित्र सनाला गालबोट लागले आहे. ऐन होळीच्या दिवशीच गावामध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली आणि या हाणामारीत दोन्ही गटातील तब्बल 38 जण यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले तर यामधील अनेक जण हे जखमी असल्याची घटना मात्र समोर आली.
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विठ्ठलवाडी येथे दोन गटात दि.24 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजे दरम्यान गटात लोखंडी रॉड सह लाठ्या काठ्याने तूफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून कैलास शिवराम राठोड राहणार विठ्ठलवाडी यांनी तक्रार दिली की रोहित गजानन राठोड पृथ्वीराज प्रेमदास राठोड यांना संदेश राठोड संतोष धावली चव्हाण सुरज दिलीप चव्हाण यांनी चिडविल्यामुळे त्यांच्यात वाद झाले नंतर तेथे वाद झाल्यामुळे त्यांचे वाद सोडवण्यासाठी गेलो असता संतोष धावजी चव्हाण, ज्ञानेश्वर संतोष चव्हाण, गोकुळ संतोष चव्हाण, तारासिंग धावजी चव्हाण, बद्रीनाथ धारासिंग चव्हाण, नारायण धारासिंग चव्हाण, सुरज दिलीप चव्हाण, दिलीप रावजी चव्हाण, रोहिदास धावजी चव्हाण, गोपाळ रोहिदास चव्हाण, धनराज मानसिंग राठोड, सुनील जगराम राठोड, दिलीप धावजी चव्हाण, चेतन अंकुश चव्हाण, नितीन अंकुश चव्हाण, शैलेश अंकुश चव्हाण, शितल ज्ञानेश्वर चव्हाण, गिताबाई संतोष चव्हाण, फुलाबाई दारासिंग चव्हाण, कांताबाई दिलीप चव्हाण, विद्या राठोड, शेषराव रामदास राठोड, सागर शेषराव राठोड, आकाश शेषराव राठोड हे संतोष धावजी चव्हाण यांच्या घरासमोर रोडवर जमा झाले व माझ्या चुलत भाऊ कुणाल उत्तम राठोड यास वरील सर्वांनी लाट्या-काठ्यांनी व हातात लोखंडी रोड ने सगळ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात काहीजण गंभीर तर काही किरकोळ जख्मी झाले तसेच त्यांच्यामधील काहींनी आमच्या दिशेने दगडफेक करून आम्हा जख्मी केले. अशी तक्रार कैलास शिवराम राठोड यांनी डोणगाव पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून डोणगाव पोलिसांनी भांदवी ३२३,३२४,३५४,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ नुसार गुण्हा दाखल केला आहे.
बद्रीनाथ दारासिंग चव्हाण वय ३९ वर्ष रा. विठ्ठलवाडी यांनी डोणगाव पोलिसात तक्रार दिली की, होळीच्या दिवशी धुड खेळण्याकरिता शेषराव राठोड यांच्या घरासमोर गेलो असता विष्णू राठोड, प्रेमदास राठोड, कैलास राठोड व इतर चार ते पाच जणांनी दारू पिऊन तेथे धुंड खेळण्याकरिता आलेल्या काही महिला व पुरुषांना येथे शिमगा व धुंड खेळायचे नाही म्हणून शिवीगाळ करीत होते. म्हणून मी व विठ्ठलवाडी चे सरपंच धनराज मानसिंग राठोड असे मिळून त्यांना समजावून सांगितले की, शिवीगाळ करू नका आम्हाला आनंदाने धुंड खेळू द्या असे म्हणून आम्ही व ते आप आपल्या घरी गेलो.मात्र सायं. ७:३० वाजता दरम्यान मी घरी हजर असताना विष्णू शिवराम राठोड, प्रेमदास विजयसिंह राठोड, कैलास शिवराम राठोड,अतुल विष्णू राठोड, अनिकेत विष्णू राठोड ,पृथ्वीराज प्रेमदास राठोड ,रोहिदास गजानन राठोड, संतोष वसंता राठोड, अभय कैलास राठोड, कुणाल उत्तम राठोड, बळीराम गजानन राठोड, चंदन लालसिंग राठोड, किशोर लालसिंग राठोड, ज्ञानेश्वर मनुसिंग राठोड, विलास प्रताप राठोड या सर्वांनी हातात लाठ्या-काठ्या,कुराड, दगड विळा घेऊन आमचे काका संतोष धावजी चव्हाण यांचे घरासमोर येऊन जोरजोरात आरडाओरडा करत शिवीगाळ करू लागले तेव्हा त्या सर्वांना शिवीगाळ का करता म्हणून विचारले असतात त्यांनी त्यांच्या हातात आणलेल्या लाट्या काठ्या कुराण व विड्यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने आमच्यावर हल्ला केला अशी तक्रार बद्रीनाथ दारासिंग चव्हाण यांनी डोणगाव पोलिसात दिली या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३२३,३२४,३५४,१४३,१४७,१४८,१४९ भांदवी नुसार गुण्हा दाखल केला आहे.