खामगांव दि.२८:मा.भारत निवडणूक अयोग यांचे आदेशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता १६ मार्च २०२४ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची अधिसुचना दि.२८ मार्च २०२४ रोजी प्रसिध्द झाली असून आचारसंहिता दि.१६ मार्च २०२४ पासुन लागू झालेली आहे व त्याच दिवशी दुपारी ३ वाजता पासून आदर्श आचार संहिताही सर्वत्र लागू करण्यात आलेली आहे.
त्या अनुंषगाने ०५ बुलढाणा लोकसभा मतदार संघ अंतर्गत २६ खामगांव विधानसभा मतदार संघा मध्ये आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे या दृष्टिकोनातून या कार्यालयामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.तथापि दरम्यानच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी नागरिकांना तक्रार दाखल करण्याकरिता उपविभागीय अधिकारी,तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी खामगांव या कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह,खामगांव येथे स्वतंत्र कक्ष स्थापित करण्यात आला आहे.
करीता सर्व नागरिकांना कळविण्यात येते की,आचारसंहिता भंग बाबत काही तक्रार असल्यास ०७२६३२९५६८८ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह खामगांव येथे तक्रार निवारण केंद्र व जनसंपर्क मदतकक्ष स्थापन करण्यात आले असून तेथे व्यक्तिश:किंवा वरील दुरध्वनी क्रमांकावरून संपर्क साधावा.असे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.