मागील 10 वर्षाचा विकास लेखी स्वरूपात ठेवलाय जनतेसमोर
बुलडाणा लोकसभे मतदार संघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी मेहकर तालुक्यातील मोहना या गावात बंजारा समाजाच्या वतीने मेळावा घेण्यात आला.. या मेळाव्याला श्री श्री हिम्मत महाराज, रायसिंग महाराज सह उमेदवार प्रतापरावं जाधव आ संजय रायामुलकर, आ श्वेता महाले, आकाश फुंडकर हे प्रामुख्याने उपास्थित होते..
गेल्या 10 वर्षात मोदी सरकारच्या विकासाचा लेखा जोखा बंजारा समाजा समोर मांडण्यात आला खा प्रतापरावं जाधव यांनी जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प, सर्व राष्ट्रीय महामार्ग तसेच खामगाव जालना रेल्वे मार्ग मंजूर करण्यात येऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आल्याने जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असल्याचे सांगीतले
यापुढे ही राज्यात बुलढाणा जिल्हा विकासाचा पॅटर्न म्हणून ओळखल्या जाईल असा विकास करण्याचा संकल्प खा प्रतापरावं जाधव यांनी यावेळी केलाय.. याकार्यक्रमाला समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते