MEHKAR VIDHANSABHA तुम्ही निवडणूक लढवा आमचा आशीर्वाद तुमच्या सोबत - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, August 28, 2024

MEHKAR VIDHANSABHA तुम्ही निवडणूक लढवा आमचा आशीर्वाद तुमच्या सोबत


          तुम्ही निवडणूक लढवा आमचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे 

डॉ. ऋतुजा चव्हाण गवई यांना भेटीदरम्यान मिळत आहेत प्रतिसाद

डॉ.ऋतुजा चव्हाण घेत आहे मायबाप मतदार यांच्या भेटीगाठी

मेहकर उच्चशिक्षित सर्वसामान्य कुटुंबातील समाजाच्या समस्यांची जाण असलेल्या व एमबीबीएस झालेल्या डॉक्टर सौभाग्य ऋतुजा ऋंषाक चव्हाण यांनी मेहकर विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी ग्रामीण व शहरी भागातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्या घेत असलेल्या मायबाप मतदारांच्या भेटीदरम्यान दिसून आले आहे डॉक्टर ऋतुजा चव्हाण गवई या मेहकर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरणार आहे त्या दृष्टीने त्यांनी मेहकर मतदारसंघातील मेहकर व लोणार तालुक्यात जाऊन प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी घेणे समस्या जाणून घेणे भविष्यात राबविण्यात येणारे उपक्रम यासंदर्भात मतदारांशी चर्चा व विचार विनिमय करताना दिसत आहे या दरम्यान त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून तुम्ही निवडणूक लढवा आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे असे या भेटीदरम्यान बोलल्या जात आहे त्यामुळे ऋतुजा चव्हाण मेहकर मतदार संघाचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी मेहनत घेत आहेत जनता जनार्दनांच्या भेटी घेत असताना त्यांनी एक माहितीपत्रक किंवा त्यांचे विचार जनतेसमोर मांडले आहेत यामध्ये. 

                 मेहकर-लोणार विधानसभा मतदार संघातील माय-बाप जनतेला...

नम्र निवेदन आदरणीय/महोदय/ महोदया, यासी सादर प्रणाम (नमस्कार)मी डॉ. सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण एका सर्वसाधारण परिवारातील लेक आहे. मी वैद्यकिय पदवी (M.B.B.S) घेऊन डॉक्टर झाले आहे. रुग्ण सेवा करीत असतांना समाजातील अनेक लोकांची आर्थिक स्थिती बघुन मनोमन वेदना होतात. हे सर्व शेतकरी, कष्टकरी, व्यावसायीक अशाच परिवारातुन आलेले असतात. 1970 च्या दशकात दाण्या-दाण्याला मौताज असलेला आपला देश आज धन-धान्याने समृध्द करणा-या समाजावरच ही वेळ कां आली? तर दुसरीकडे सत्तेशी संगनमत करुन लग्न सोहळ्यास हजारो कोटी खर्च करणारे मुठभर श्रीमंत उद्योगपती. 

ही गरीबी आणि श्रीमंतात निर्माण झालेली खाई नैसर्गीक नाही. शेतात राबणा-या समाजावर होणारा हा अन्याय आहे. सत्ताधारी याची दखल कां घेत नाही? ह्या संदर्भात सुशिक्षीत व संवेदनशील असणा-या मध्यम वर्गीय स्नेही यांनी लोकसभा आणि विधानसभा या सभागृहात काही प्रमाणिक तसेच अभ्यासु आणि राजकारणापेक्षा समाजकारणाशी बांधीलकी असलेले लोक प्रतिनीधी (खासदार-आमदार) निवडुन जातील असा विचार व्यक्त केला. आनयस आपला मेहकर मतदार संघ मागासवर्गीय वर्गासाठी राखीव असल्याने या सर्वांनी मला मेहकर-लोणार विधानसभा निवडणुक लढविण्याचा प्रस्ताव ठेवला.  हे ही पहा, खोट्या जात प्रमाणपत्रावर यांच्या दुकानदाऱ्या.माजी मंत्री सुबोध सावजी.. आमदाराला निवडणुकीत फटका बसणार...?

कोणत्याही समाजाचा विकास हा त्यांना मिळणा-या आरोग्य, शिक्षण, रोजगार, आणि श्रममुल्य (शेती मालाचे भाव) या मुलभुत सुविधांवर आधारीत असतो. त्यासाठी प्रामाणिक लोक प्रतिनीधी सभागृहात जाण्याची गरज लक्षात घेऊन मी मेहकर विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी संमती दिली आहे. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी आपल्या मतदार संघातील प्रत्येक गाव-वस्ती ला आम्ही भेट देण्याचे ठरविले आहे. त्या संबधात पुर्ण सुचना आधीच्या दिवशी देण्यात येईल. कोणत्याही आजाराचे योग्य निदान झाल्याशिवाय योग्य उपचार होत नाही. हे एक डॉक्टर म्हणुन मला कळते. तसेच मतदार संघातील प्रत्येक गावाच्या स्थानिक समस्या (प्रश्न) जाणुन घेण्याचा माझा व सहका-यांचा प्रयास असेल.

आपला बुलढाणा जिल्हा दोन कारणांसाठी जग प्रसिध्द आहे. पहिले म्हणजे शेतक-यांचे कैवारी राजे छत्रपती शिवरायांच्या मातोश्री माँ जिजाऊंचे जन्मस्थान आणि दुसरे म्हणजे जगातील सर्वात सुपीक शेती आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आहे. तरीही आपल्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असतील तर ही शोकांतीकाआपल्याला निर्धाराने पुसुन टाकायची आहे. त्यासाठी सामाजिक कर्तव्य-निर्वाहनाच्या हेतुने मी लोकशाहीच्या माध्यमातुन विकासाचे उद्दीष्ट घेऊन काम करणार आहे. आपल्या सर्वाचे सहकार्य आणि आशिर्वाद अपेक्षित आहे. 

आपलीच... डॉ. सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण (गवई) (M.B.B.S) अध्यक्षा राजमाता जिजाऊ सामाजिक फाऊंडेशन

ऋतुजा चव्हाण (गवई)यांच्या मनात जनतेबद्दल असलेल्या भावना त्यांनी आपल्या पत्रांमधून व्यक्त करून ते पत्रक किंवा माहिती त्या मेहकर व लोणार तालुक्यात प्रत्येक खेडेगावात जाऊन लाखो कुटुंबाच्या भेटी घेत आहेत या दरम्यान त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Post Top Ad

-->