ऐन निवडणुकीच्या तोंडावरच कामाचे उद्घाटन कशासाठी! जनतेची दिशाभूल तर होत नाही ना !
निवडणुकीच्या तोंडावरच लोकप्रतिनिधी करतात जनतेची संपर्क
बुलढाणा सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत याच पार्श्वभूमीवर मेहकर विधानसभेची सुद्धा निवडणूक आहे मात्र निवडणुकीच्या दरम्यान विविध विकास कामाचे निवडणुकीच्या तोंडावरच उद्घाटन कसे होतात निवडणुकीच्या अगोदरही काही कामाचे उद्घाटन होत असते मात्र निवडणुका जवळ आल्या की उद्घाटन करण्याचा बाजार भरतो एकामागे एक असे उद्घाटन चालूच असतात मात्र ज्या कामाचे उद्घाटन झाले ते काम कधी मार्गी लागणार कामाला सुरुवात कधी होणार व काम पूर्ण कधी होणार याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध राहत नाही केवळ उद्घाटन करायचे एक बोर्ड त्या ठिकाणी लावायचे व नंतर त्या कामाकडे पाहायचेच नाही अशी परिस्थिती अनेक निवडणुकीच्या वेळेस दिसून येत आहे ही जनतेची दिशाभूल तर नाही ना असे म्हणण्याची वेळ सुद्धा येत आहे अनेक लोकप्रतिनिधी मग ते विद्यमान असो किंवा इच्छुक असो निवडणूक जवळ आली की जनतेशी जास्त संपर्क करतात प्रत्येक गावामध्ये स्वतः जाऊन जनतेला भेटतात अडीअडचणी जाणून घेतात मग ह्या अडीअडचणी पाच वर्षात नसतात का पाच वर्षात हे इच्छुक किंवा विद्यमान लोकप्रतिनिधी जनतेची संपर्क का ठेवत नाही असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. हे ही पहा दैनिक आपला विदर्भ 8 सप्टेंबर
सध्या मेहकर विधानसभेची निवडणूक सुरू होत आहे त्या दृष्टीने विद्यमान लोकप्रतिनिधी व इतर इच्छुक उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी घेत आहेत मेहकर व लोणार तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकापर्यंत जात आहेत प्रत्येक गावात जाऊन विचारपूस अडीअडचण चौकशी करत आहेत मग प्रश्न असा उपस्थित होतो की एकदा निवडून आल्यावर पाच वर्षे हे लोकप्रतिनिधी त्या गावात का जात नाहीत त्या त्या गावच्या समस्या साडी अडचणी जाणून का घेत नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे या दरम्यान पाच वर्ष विविध गावात विकास कामे का करत नाहीत निवडणुकीच्या तोंडावरच अगदी एक ते दोन महिन्यात अनेक कामाचे उद्घाटन का करतात असे अनेक प्रश्न उपस्थित होतात निवडणुकीत मतदारांचा केवळ मतदानापुरता उपयोग करायचा का त्यानंतर पाच वर्ष त्यांच्या समस्या अडीअडचणी कोण सोडवणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे मात्र काहीही असले तरी मेहकर मतदारसंघात निवडणुकीच्या हालचालींना वेग येत आहे विद्यमान लोकप्रतिनिधी व इच्छुक उमेदवार यांची मोठ्या प्रमाणात धावपळ दिसून येत आहे मात्र जनतेशी कितीही संपर्क केला व कितीही उद्घाटन केले तर जनता जनार्दन खूप हुशार झाली आहे कोणाला मतदान करायचे हे जनतेने अगोदरच ठरवून ठेवलेले असते मात्र लोक बोलून दाखवत नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे तरीसुद्धा मीच कसा चांगला मीच विकास करू शकतो मीच तुमच्या कामी पडतो असे सांगत सर्वच जनतेशी संपर्क करत आहेत मात्र काहीही असले तरी अगदी निवडणुकीच्या तोंडावर होणारे विविध कामाचे उद्घाटन व जनतेशी वाढलेला इच्छुक व विद्यमान लोकप्रतिनिधीचा जनसंपर्क यामुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे