Mehakara vidhanasabha उबाठाकडे मेहकरची जागा गेल्यास विद्यमान आमदाराला करावी लागणार कसरत - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, September 6, 2024

Mehakara vidhanasabha उबाठाकडे मेहकरची जागा गेल्यास विद्यमान आमदाराला करावी लागणार कसरत


काँग्रेसला जागा सुटल्यास आमदार रायमुरकर यांना निवडणूक होणार सोपी 

लोकसभेत वाढलेले महाविकास आघाडीचे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार 

मेहकर विधानसभेची निवडणूक सुरू आहे त्या दृष्टीने सर्वच पक्षाच्या हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे मेहकर विधानसभेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी सर्वच राजकीय राजकीय पक्ष कामाला लागले आहेत यामध्ये महायुती व महाविकास आघाडी हे महत्त्वाचे पक्ष असून तिसरी आघाडी, वंचित आघाडी कडूनही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे मेहकरची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर सुटली तर विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे मात्र मेहकरची जागा जर काँग्रेस पक्षाला सुटली तर आमदार संजय रायमुलकर यांना ही निवडणूक अगदी सरळ व सोपी होणार आहे लोकसभेत वाढलेले महाविकास आघाडीचे मतदान विधानसभेत कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. हे ही वाचा दैनिक आपला विदर्भ ई पेपर 6 सप्टेंबर

 याबाबत सविस्तर वृत्त असे की मेहकर विधानसभेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच अपयश येत आहे मात्र यावेळेस लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेले चांगले मतदान पाहता महाविकास आघाडीचे चांगले दिवस येण्याची शक्यता आहे मात्र महाविकास आघाडीत मेहकरची जागा कोणत्या पक्षाकडे जाते हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे आहे काँग्रेस यावेळेस मेहकर विधानसभेवर दावा करत आहे मात्र काँग्रेसला सतत अपयश येत असून विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांना चांगलाच फायदा होताना दिसत आहे यावेळेसही काँग्रेसकडून मेहकरची जागा मागितल्या जात आहे त्यामुळे नेमके राजकारण काय चालू आहे हेच जनतेला कळेनासे झाले आहे दुसरीकडे शिंदे गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असे शिवसेनेचे दोन गट पडले आहेत मात्र बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा मतदार वर्ग मेहकर मतदार संघात आहे मात्र दोन गट पडल्यामुळे मताची विभाजणी होणार का असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होत आहे मात्र अजूनही बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा मतदार वर्ग मेहकर मतदार संघात असल्याने जर मेहकरची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली व स्थानिक पातळीवरचा उमेदवार जर दिला तर आमदार संजय रायमुलकर यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे मात्र काहीही असले तरी सध्याचे वातावरण पाहता मेहकरची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच जाईल असे वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे मात्र जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मेहकरची जागा दिली तर काँग्रेस पक्ष इमानदारीने काम करणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे तर या महायुती व महाविकास आघाडीच्या भानगडी मध्ये तिसरी आघाडी व वंचित बहुजन आघाडी नेमकी कोणती भूमिका बजावणार कोणत्या उमेदवाराला पाडण्यासाठी मतदान खाणार किंवा कोणत्या उमेदवाराला आणण्यासाठी मतदान खाणार हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे मात्र काहीही असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून सिद्धार्थ खरात यांनी तीन सप्टेंबर रोजी शिवबंधन बांधले आहे तर डॉक्टर जानू मानकर गोपाल बच्चीरे यांचीही नावे चर्चेमध्ये आहेत सध्या मेहकर मतदारसंघाची परिस्थिती पाहता महायुतीकडून शिंदे गटाला मेहकरची जागा फायनल असून आमदार संजय रायमुलकर हेच उमेदवार राहणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे बोलल्या जात आहे मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा सोडण्यावरूनच गोंधळ सुरू असून तिकिट अजून कोणालाच फायनल नसल्याची चर्चा आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मेहकर विधानसभा सुटली तर विद्यमान आमदाराला करावी लागणार तार्‍यावरची कसरत ही मात्र तेवढेच खरे..‌

Post Top Ad

-->