Jalgaon: रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर चोपड्यात बाजार गजबजला - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, March 19, 2026

Jalgaon: रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर चोपड्यात बाजार गजबजला

 

 रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर चोपड्यात बाजार गजबजला

 मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून या महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास करतात.

महिनाभराच्या उपवासानंतर रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते.

रमजान ईद अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असून, त्यानिमित्त चोपडा शहरातील आझाद चौक व मुस्तफा बाबा मशिद परिसरात रंगीबेरंगी शेवया आणि सुकामेवा विक्रीची दुकाने लागली आहेत.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेवया व सुकामेव्याला मोठी मागणी आहे. मात्र यंदा शेवया व सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

भाववाढ झाली असली तरी काही प्रमाणात मुस्लिम बांधव खरेदीसाठी येत आहेत. तर काही ग्राहक भाव कमी होण्याची अपेक्षा ठेवून प्रतीक्षा करत असल्याचे सुकामेवा व शेवया विक्रेत्यांनी सांगितले.


Post Top Ad

-->