सोनखार-पामबीचमध्ये ‘संयुक्त कुटुंब’ संकल्पगुढी; नववर्षाचे उत्साही स्वागत......
नवी मुंबई गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोनखार-पामबीच परिसरात हिंदू नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सेक्टर १६ येथील गुनीना मैदानावर ‘संयुक्त कुटुंब’ या संकल्पनेतून भव्य गुढी उभारण्यात आली. नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते गुढीचे पूजन करून उभारणी करण्यात आली.
ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारल्यानंतर संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. लेझीमच्या तालावर रंगलेले सादरीकरण आणि आकर्षक रांगोळ्यांनी उत्सवाची शोभा अधिकच वाढवली. लहान मुलं, तरुण आणि महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमात पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या सहभागींचा आयोजकांकडून विशेष सन्मान करण्यात आला. ‘संयुक्त कुटुंब’ ही संकल्पना जपण्याचा आणि समाजात एकात्मता वाढवण्याचा संदेश देणारा हा उत्सव परिसरासाठी प्रेरणादायी ठरला.
.jpg)