ठाण्यात नवरात्र मिरवणुकीत शिंदे यांचा दिलदारपणा; पोलिस आणि चिमुकल्यांना स्वतः वडापाव वाटप
ठाणे पूर्वेकडील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या स्वागत मिरवणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब सहभागी झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी तंदूर वडापाव स्टॉलला भेट दिली, मात्र स्वतः वडापाव न खाता कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांना आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या लहान मुलांना वडापाव वाटप करत आपला दिलदारपणा दाखवला.शिंदे यांच्या या संवेदनशील कृतीमुळे पोलिस भगिनी आणि बच्चे कंपनीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले
.jpg)