शिखर शिंगणापूर यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या कावडींची उभारणी
सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे. या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या शंभू महादेवाच्या कावडींची उभारणी विविध ठिकाणी करण्यात आली आहे.
बारामती तालुक्यातील झारगडवाडी व डोर्लेवाडी येथे कावडींची उभारणी करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली.
शिखर शिंगणापूर यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुंगी घाट. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक उपस्थिती लावत असतात. या सर्व कावडी मुंगी घाटाची अवघड चढण पार करत शिखर शिंगणापूर येथे दाखल होतात.
या यात्रेचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे कावडींच्या हंड्यातून विविध नद्यांचे पवित्र जल आणून त्या जलाचा शंभू महादेवावर अभिषेक करण्याची परंपरा आहे.
.jpg)