खत-बियाण्यांचा तुटवडा टाळा; शेतकऱ्यांच्या हितासाठी गोपाल आखाडे यांचे खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, June 11, 2026

खत-बियाण्यांचा तुटवडा टाळा; शेतकऱ्यांच्या हितासाठी गोपाल आखाडे यांचे खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन


खत-बियाण्यांचा तुटवडा टाळा; शेतकऱ्यांच्या हितासाठी गोपाल आखाडे यांचे खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन

 APALA VIDARBH NEWS NETWORK 
खरीप हंगामाची सुरुवात होताच शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात दर्जेदार बियाणे व रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोपाल सुभाषराव आखाडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.> शेगावात भक्तांचा महासागर! अधिक मासाच्या शेवटच्या गुरुवारी लाखोंची गर्दी 🔴 APALA VIDARBHA LIVE Video link

निवेदनात आऱ्हाड यांनी नमूद केले आहे की, पावसाळ्याची सुरुवात झाल्याने पेरणीची कामे वेगाने सुरू होत असून शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात बियाणे व खतांचा पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी खत-बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून कृत्रिम टंचाई, जादा दराने विक्री आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्याच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात तालुक्यातील सर्व कृषी केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना योग्य दरात खत-बियाणे मिळतील याची खात्री करणे, कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या व जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणे तसेच नियमित तपासणी मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
यंदा सुपर एल-निनोमुळे पावसाबाबत अनिश्चितता असल्याने शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही गोपाल आखाडे यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव पंकज पळसकर. शहराध्यक्ष करण मानवतकर गणेश आढव सह पदाधिकारी उपस्थित होते.

Post Top Ad

-->