आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील जुनी आययुडीपी परिसरातील १, काळे फाईल परिसरातील २, ग्रीन पार्क कॉलनी परिसरातील १, चंडिकावेस परिसरातील १, वारा जहांगीर येथील ७, दोडकी येथील १, मालेगाव तालुक्यातील कोयाळी येथील १, कारंजा लाड शहरातील बालाजीनगर परिसरातील १, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, आसेगाव पेन येथील ३, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच जिल्ह्याबाहेर आणखी ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याची नोंद झाली आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह –१४९४
ऍक्टिव्ह – ३६५
डिस्चार्ज – ११०२
मृत्यू – २६ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)