भंडारा जिल्ह्यात आज कोरोनाचे 39 रुग्ण 05 रुग्णांना डिस्चार्ज - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, August 24, 2020

भंडारा जिल्ह्यात आज कोरोनाचे 39 रुग्ण 05 रुग्णांना डिस्चार्ज


 पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 859

  बरे झालेले रुग्ण 462

 क्रियाशील रुग्ण 383

 मृत्यु एक रुग्ण 

 एकूण मृत्यू 14

  भंडारा दि. 24 (जिमाका) जिल्ह्यात आज पाच कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत तर नव्या 39 रुग्णांची नोंद झाली आहे.

    कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 30, साकोली 00, लाखांदूर 01, तुमसर 01, मोहाडी 00,   पवनी 04 व लाखनी तालुक्यातील 03 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 462 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 859 झाली असून 383 क्रियाशील रुग्ण आहेत. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 14 झाली आहे.

    आज 24 ऑगस्ट रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 148 व्यक्ती भरती असून 1102 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून  डिस्चार्ज  देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6330 व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात 261 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 6069 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 भंडारा व लगतच्या जिल्हयामध्ये कोरोना संसर्गाची वाढती संख्या व सणासुदीचे दिवस बघता अत्यावश्यक असेल तेव्हाच नागरिकांनी घराबाहेर पडावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केलेआहे. 

Post Top Ad

-->