बुलडाणा आज मिळालेल्या माहितीनुसार मागील 24 तासात
काल सकाळी 9 ते आज सकाळी 9 पर्यंत. प्राप्त झालेल्या 472 कोरोना अहवालांमध्ये 62 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे तर 410 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
काल सकाळी 9 वाजेनंतर दिवसभरातून आढळून आलेले कोरोना संसर्गित पुढीलप्रमाणे आहेत.. मेहकर 02, लोणार 19, मोताळा 04, चिखली 04, नांदुरा 13, मलकापूर 01, खामगाव 17 आणि बुलढाणा 02 असे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गित रुग्णांचा आजपर्यंतचा आकडा 1830 झाला असून सद्यस्थितीत जवळपास 700 च्या वर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच,आजवरचा कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा 35 वर जाऊन पोहोचला आहे.