भारत स्काऊट-गाईड जिल्हा संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, August 8, 2020

भारत स्काऊट-गाईड जिल्हा संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत

पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द 

बुलडाणा, (जिमाका) दि.8 – भारत स्काऊट / गाईड बुलडाणा जिल्हा संस्थेच्यावतीने कोविड 19 साथरोगाविरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 42 हजार 374 रूपयांची आर्थिक मदत दिली. या मदतीचा धनादेश आज संस्थेचे अध्यक्ष नितीन शिंगणे यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सुपूर्द केला.
 याप्रसंगी स्काऊट/ गाईड चे मुख्य आयुक्त डॉ. पी. एस वायाळ, गाईड आयुक्त सौ स्नेहलता मानकर, संस्थेचे सचिव आर. शिंगणे, पदाधिकारी प्रविण टेंभरे, सौ. वैशाली हिंगे, सुभाष आठवले, डॉ. नरवाडे, योगेश वायाळ, प्रशिक्षण उपायुक्त श्री. शिंबरे, कर्मचारी सुधाकर साखरे, किरण लहाने आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.

                                   

Post Top Ad

-->