भंडारा जिल्ह्यात आज कोरोनाबाधित 64 तर 11 रुग्णांना डिस्चार्ज - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, August 23, 2020

भंडारा जिल्ह्यात आज कोरोनाबाधित 64 तर 11 रुग्णांना डिस्चार्ज

भंडारा दि. 23 (जिमाका) जिल्ह्यात आज 11 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत तर नव्या 64 रुग्णांची नोंद झाली आहे.

   कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 15, साकोली 00, लाखांदूर 07, तुमसर 06, मोहाडी 10,   पवनी 07 व लाखनी तालुक्यातील 19 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 457 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 820 झाली असून 350 क्रियाशील रुग्ण आहेत. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 13 झाली आहे. 

   आज 23 ऑगस्ट रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 174 व्यक्ती भरती असून 1058 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून  डिस्चार्ज  देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6108 व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात 239 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 5869 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 820

बरे झालेले रुग्ण 457

क्रियाशील रुग्ण 350

आज एक मृत्यू

एकूण मृत्यू 13

Post Top Ad

-->