पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह : 66 जणांना सुट्टी एकाचा मृत्यु ; 40 नव्याने पॉझेटिव्ह - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, August 21, 2020

पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह : 66 जणांना सुट्टी एकाचा मृत्यु ; 40 नव्याने पॉझेटिव्ह

पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह : 66 जणांना सुट्टी एकाचा मृत्यु ; 40 नव्याने पॉझेटिव्ह 


यवतमाळ, दि. 21 : वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 66 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 40 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

मृत झालेला व्यक्ती हा पुसद येथील आंबेडकर वॉर्डातील रहिवासी 60 वर्षीय पुरुष आहे. आज (दि. 21) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 40 जणांमध्ये 24 पुरुष आणि 16 महिला आहेत. यवतमाळ शहरातील श्रीकृष्ण सोसायटी येथील तीन महिला, सेजल सोसायटी अंबिका नगर येथील तीन पुरुष व तीन महिला, आदर्श नगर येथील एक पुरुष व एक महिला आणि यवतमाळ शहरातील एक पुरुष, महागाव शहरातील एक पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, बाभुळगाव शहरातील दोन पुरुष, आर्णि शहरातील पोलिस स्टेशन जवळील एक पुरुष, आंबेडकर चौकातील तीन पुरुष, झरी शहरातील दोन पुरुष, वणी शहरातील वामन घाट येथील एक पुरुष, वणी शहरातील एक पुरुष व तीन महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील एक पुरुष, दारव्हा शहरातील चार पुरुष व तीन महिला आणि नेर तालुक्यातील मालखेड येथील एक महिला पॉझेटिव्ह आले आहेत. 

सद्यस्थितीत जिल्ह्यात 620 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 175 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2522 झाली आहे. यापैकी 1664 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 63 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 152 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी 168 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 39908 नमुने पाठविले असून यापैकी 39161 प्राप्त तर 747 अप्राप्त आहेत. तसेच 36639 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. 

Post Top Ad

-->