बुलडाणा शहरात नवे 7 कोरोना पॉझिटिव्ह
मिळालेल्या माहितीनुसार आज बुलडाणा शहरात नव्या 7 कोरोना रुग्णांची भर पडली असून त्यात चिखली रोड आनंद नगर मधील एक 45 वर्षीय पुरुष, लहाने ले आऊट मधील 68 वर्षीय पुरुष, जांभरून रोड वरील गजानन नगर मधील 48 वर्षीय पुरुष, इकबालनगर मध्ये एक 32 वर्षीय डॉक्टर, 4 वर्षीय मुलगा, 35 वर्षीय पुरुष असे तीन जण तसेच बुलडाणा पत्ता असलेली 82 वर्षीय वृद्ध महिला असे एकूण 7 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले आहेत.