90 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर
यवतमाळ, दि. 26 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 83 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 90 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली.
मृत झालेल्या दोन जणांमध्ये दारव्हा शहरातील 86 वर्षीय पुरुष आणि महागाव तालुक्यातील 84 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात 24 तासात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 90 जणांमध्ये 49 पुरुष आणि 41 महिला आहेत. यात पुसद शहरातील नऊ पुरुष व नऊ महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील तीन पुरुष व एक महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष, आर्णि शहरातील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील नऊ पुरुष व दहा महिला, दिग्रस तालुक्यातील दोन पुरुष, महागाव तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील चार पुरुष, यवतमाळ शहरातील 10 पुरुष व 12 महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील दोन महिला, घाटंजी शहरातील दोन पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व चार महिला पॉझेटिव्ह आले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 649 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 232 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2915 झाली आहे. यापैकी 1964 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 70 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 190 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 345 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 44851 नमुने पाठविले असून यापैकी 43282 प्राप्त तर 1569 अप्राप्त आहेत. तसेच 40367 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.