रायगड जिल्ह्यातील महाड इमारत दुर्घटनेतील मदत आणि बचाव कार्य ४० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पुर्ण झाले. यात चार वर्षाचा चिमुकला व ६५ वर्षाच्या आजीबाईला एसडीआरएफच्या पथकान सुखरुप बाहेर काढल आहे. ढिगाऱ्यात अडकलेले अन्य १७ जण या अपघातात मृत्यूमुखी पडले असून ९ जण जखमी झाले आहेत.
इमारतीत राहणारे ४७ संसार रस्त्यावर आले आहेत. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. इमारतीचा बिल्डर फरार असून या प्रकरणी ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.