सलग दुसऱ्या दिवशीही बरे होणाऱ्यांनी संख्या अधिक - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, August 26, 2020

सलग दुसऱ्या दिवशीही बरे होणाऱ्यांनी संख्या अधिक


भंडारा दि. 26 (जिमाका) जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून आज 30 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 533 झाली आहे. तर आज नव्या 28 रुग्णांची नोंद झाली आहे.

    कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 17, साकोली 05, लाखांदूर 00, तुमसर 01, मोहाडी 00,   पवनी 04 व लाखनी तालुक्यातील 01 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 533 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 927 झाली असून 378 क्रियाशील रुग्ण आहेत. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 16 झाली आहे.

    आज 26 ऑगस्ट रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 140 व्यक्ती भरती असून 1151 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून  डिस्चार्ज  देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 7077 व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात 324 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 6753 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 भंडारा जिल्ह्यात आज कोरोनाबाधित 30 रुग्णांना डिस्चार्ज

 28 नव्या बाधितांची भर

 पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 927

 बरे झालेले रुग्ण 533

 क्रियाशील रुग्ण 378

 आज एक मृत्यू

 एकूण मृत्यू 16



Post Top Ad

-->