आज पासून बुलडाणा जिल्हा शनिवार-रविवार कर्फ्यु मुक्त
आजपासून शनिवार, रविवार कर्फ्युमुक्त {कर्फ्यु हटला }पण लॉकडाऊनचे नियम कायम
सर्व व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक तसेच लघुविक्रेत्यांना कळविण्यात येत आहे की, जिल्हा प्रशासनाने एका आदेशान्वये २१ ऑगस्ट २०२० पर्यंत शनिवार आणि रविवार या दोन दिवशी संपूर्ण संचारबंदीची घोषणा केली होती. आज, सदर आदेश संपुष्टात आला असल्याने उद्या, शनिवारपासून नियमितपणे आपली प्रतिष्ठाने राज्य सरकारच्या लॉकडाऊन निर्बंधासह उघडण्यास मुभा राहिल. रविवारच्या दिवशी कुठलाही कर्फ्यू राहणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री पुरी यांनी ही माहिती दिली आहे. मात्र साप्ताहिक बाजार भरणार नाही. आठवडी बाजारावर निर्बंध लागू राहील. याशिवाय जीम, बियर बार, हॉटेल, स्विमींग पूल, सिनेमागृह यावर राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे बंदी राहील. संध्याकाळी ७ ते दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत नेहमीसारखी संचारबंदी असेल. उद्यापासून शनिवार आणि रविवारी कुठलीही संचारबंदी नसेल, याची पुनश्च सर्वांनी नोंद घ्यावी.