बुलढाणा जिल्हातील पावणेतीन लाख विध्यार्थ्यांना मिळणार उन्हाळी सुट्टी मधील पोषण आहाराचा.
सोशल डिस्टन्स व कोरोना विषयक नियम पाळून पोषण आहाराच्या डाळी व तांदुळाचे वाटप होणार.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा बंद आहेत तर मजूर वर्गाच्या हाताला काम नाही अश्यातच उन्हाळी सुट्टी मध्ये सुद्धा दुष्काळी परिस्थितीत मिळणारे शालेय पोषण आहार कोरोना काळात सुद्धा मिळणार असून सध्या जिल्हात या पोषण आहाराचे वाटप होणार असून पावणे तीन लाख विध्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. कोरोनाच्या काळात व्यापार,कामधंदे सर्वकाही बंद झाल्याने सर्वसामान्य जनतेला खूप मोठया प्रमाणात कोरोना पेक्षाही मोठ्या आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे अश्यातच केंद्र शासनाने दुष्काळी परिस्थितीत उन्हाळी सुट्टी मध्ये शालेय पोषण आहार देण्या संबंधी उपाय योजना आहे तशीच परिस्थिती कोरोना काळात झाली तेव्हा शासनाने उन्हाळी सुट्टी मधील सुट्याचे दिवस वगळता ३४ दिवसाचे १ ते ८ वर्गातील विध्यार्थीचे हे पॅकिंगचे पोषण आहार तांदूळ व डाळीचे वाटप सोशल डिस्टन्स पाळून केल्या जाणार आहे.
बुलढाणा जिल्हात १ ते ५ मध्ये शिकणारे पोषण आहार लाभार्थी संख्या १ लाख ६५ हजार १४१ विध्यार्थी आहेत तर ६ ते ८ परियांतचे १ लाख ९ हजार ८२० विध्यार्थी असून या सर्व विध्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी मधील ३४ दिवसाचे तांदूळ व मुंग डाळ,हरभरा कडधान्य स्वरूपात मिळणार या मध्ये १ ते ५ च्या विद्यार्थ्याला तांदूळ ३ किलो ४०० ग्राम,हरभरा १ किलो २०० ग्राम,मुंगडाळ ६०० ग्राम तर ६ ते ८ च्या विद्यार्थ्याला तांदूळ ५ किलो १०० ग्राम,हरभरा १ किलो ८०० ग्राम,मुंगडाळ ९०० असे हे पोषण आहार पॅकिंगच्या स्वरूपात मिळणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सोशल डिस्टन्स आणि कोरोना विषयक असलेले नियम पाळून हे पोशन आहार वाटप होणार आहे.