बुलडाणा, (जिमाका) देि.9 - जिल्ह्यातील अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या जिगाव प्रकल्पात पूर्णतः बाधित होणाऱ्या जळगाव जामोद तालुक्यातील हिंगणे बाळापूर गावाच्या पुनर्वसनाचा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला.
जिगाव प्रकल्पात पूर्णतः बाधित असलेल्या हिंगणे बाळापूर गावाचे वास्तुविशारद यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण पद्धतीने पुनर्वसन करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, नाल्या, शाळा इमारत यासह विविध काम करण्यात येत आहे. हे काम योग्यप्रकारे होत आहे किंवा कसे याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आज पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे हिंगणे बाळापूर गावात दाखल झाले. यावेळी त्यांनी गावामध्ये होत असलेल्या विविध विकास कामाची पाहणी करून उपस्थित ग्रामस्थांना गावात होत असलेल्या कामाच्या गुणवत्ता आणि कामाच्या प्रगतीबाबत समाधानी आहात का याची विचारणा केली. त्याच बरोबर शाळा इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून
यावेळी प्लॉट वाटपाचा विषय तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच हिंगणे बाळापूर गावाच्या बुडीत क्षेत्र व गावठाणाचे 100 टक्के पैसे जमा झाले असून लवकरात लवकर आवार्ड करून त्याचे लाभार्थ्यांना वाटप करावे असे आदेश दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील अवचार, रंगराव देशमुख, अधीक्षक अभियंता एन एन सुपेकर, कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे, उपअभियंता छोटूलाल पाटील यांच्यासह सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.