मागिल गत पंधरा दिवसांच्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य कुटुंब सुद्धा उध्वस्त झाले आहे.यामध्ये मादणी येथिल सर्वसामान्य कुंटुबांतील एक व्यक्ती नितीन अग्रवाल तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना मेहकर, यांचे घराचे संपुर्ण भिंती कोसळून नुकसान झाले होते.नितीन अग्रवाल संघटनेच्या माध्यमातून नेहमिच सतत शेतक-यांना व सर्वसामान्य व्यक्तीसाठीच चळवळीत लढत ख-या अर्थाने न्याय देण्याचे भुमिका नेहमिच पार पाडत असतात माञ सदर कार्यकर्ता आज नैसर्गिक आपत्ती मुळे संकटात असल्यामुळे.
असे चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्ते भविष्यात खचुन जाऊ नाही म्हणुन त्यांची रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाध्ये आज पदाधिकारी यांच्यासह जिल्हाअध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांनी पदाधिकारी यांच्यासह भेट घेऊन त्यांच्या कुटुंबाला आज वर्गणी करुन एक लाख अकरा हजार रुपये चा धनादेश त्यांना आज सुपुर्द केला. अशा प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहे तुम्ही एकटे नाही.असे वादळे येतात जातात आपण पुन्हा नव्या ताकदीने व जोमाने सर्व उभे करु "उम्मिद पे तो दुनिया कायम है! म्हणत आपल्याला या अडचणीतुन बाहेर काढु व तुमचा निवारा पुन्हा उभा करु तसेच प्रशासनाच्या स्तरावरुन सुध्दा मदतीसाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन आज संघटनेच्या बिल्यावाल्या कार्यकर्त्यांच्या परीवाराला दिले.यावेळी जिल्हाअध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले,जिल्हाउपाध्यक्ष अनिल बोरकर,प्रफुल्ल देशमुख,अमोल धोटे,सरपंच भाऊराव जावळे,गणेश जुनघरे,सहदेव लाड,अनिल मोरे,देवाभाऊ आखाडे,गोपाल सुरडकर,विष्णु धांडे,,संतोष टाले,गौतम सदावर्ते सर,अनिल ठोकळ,शब्बीर भाई,शेख बब्बलु,ओम ठोकळ,शे.रऊफ शे नवाज,दगडु हांडे,राजु पळसकर,कैलास उतपुरे,सुरेश खरात,उत्तम खरात, तय्यब शहा,समाधान पद्मने,भुषन मोरे,तुकाराम खाडे,मिथुन साळवे,शाम जाधव, उपस्थित होते.