आज सकाळी ३५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १४ महिला व २१ पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर येथील ३१ जण, चरणगाव ता. पातूर येथील दोन जण तर उर्वरित कृषी नगर व तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बोरगांव मंजू येथील ८७ वर्षीय पुरुष असून तो दि. २३ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
रॅपिड टेस्ट मध्ये 33 पॉझिटिव्ह
काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
आताची सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २९८१+६४२=३६२३
मयत-१४५, डिस्चार्ज- ३०५४
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४२४