आंतरजिल्हा बस वाहतुकीचे वेळापत्रक जाहीर - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, August 21, 2020

आंतरजिल्हा बस वाहतुकीचे वेळापत्रक जाहीर

 आंतरजिल्हा बस वाहतुकीचे वेळापत्रक जाहीर


बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने दि.20 ऑगस्ट 2020 आंतरजिल्हा प्रवाशी बसेस सुरु केल्या आहेत. सदर प्रवाशी वाहतूक बसेस 50 टक्के आसन (प्रत्येक बसमध्ये फक्त22) क्षमतेने प्रवाशांना पुर्वीच्या दराने प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्क घालणे बंधनकारक राहील. बसेस पुर्णत: निर्जंतुकीकरण करुन चालविण्यात येणार आहेत. तसेच आंतरजिल्हा बस वाहतुकीचे वेळापत्रक बुलडाणा विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.


   प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार फेऱ्यामध्ये वाढ करण्यात येईल, प्रवाशांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक राहील. प्रवाशांसाठी ईपासची आवश्यकता राहणार नाही. तरी या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.


आंतरजिल्हा बसेसचे वेळापत्रक

   बुलडाणा आगारातून  अकोला सकाळी 8 व दुपारी 2, औरंगाबाद सकाळी 5.30, 6.15, दुपारी 1, 1.30, 3.30, भुसावळ सकाळी 6.45, जामनेर सकाळी 7.15, नागपुर सकाळभ्‍ 9, 11 व दु 1.30, अमरावती सकाळी 6.30, 8, 10.15, दु. 12 व सायं 4,   लातुर सकाळी 8.30, पुणे सकाळी 9.15, रात्री 9.15, पंढरपुर सकाळी 7.30, यवतमाळ दुपारी 3.30, धुळे सकाळी 7.15, परतवाडा, दु. 1,  चिखली आगार येथून औरंगाबाद दु. 12.30, दु. 3.15,  जळगांव खां स 6.15, 11.45,नाशिक सकाळी 8.15, नागपुर सकाळी 9.15, पुणे सकाळी 7.30 व सायं 6.30,  त्र्यंबकेश्वर सकाळी 9.30, शिर्डी सकाळी 6, खामगांव आगार येथून अकोला दर अर्ध्यातासाला विना वाहक, नाशिक सकाळी 9.45, शिर्डी सकाळी 6.15, सकाळी 7.05, सकाळी 9.45,  नांदुरीगड (सप्तश्रंगीगड) सकाळी 8.30, औरंगाबाद सकाळी 9.30,  मेहकर आगार येथून पुणे सकाळी 8, पंढरपुर सकाळी 8.15, नागपुर सकाळी 7.30, त्र्यंबकेश्वर सकाळी 7, लातुर सकाळी 9.45, जळगांव खांदेश सकाळी 6, 7, 8, 9 व सकाळी 10, अकोला सकाळी 6.30, मलकापुर आगार येथून पुणे सकाळी 6.45 व सायं 6.30, वाशिम सकाळी 9, औरंगाबाद सकाळी 4.45, 5.15, 6, 7, 7.30, 7.45, 8.15, 8.45, 9.30, 10.15, 11.15, 12, दु. 2, वझर सरकटे सकाळी 8.45, जळगांव जामोद आगार येथून अकोला सकाळी 6.25, 9.30, 1.30, 2.15, पुणे सकाळी 8, 9.15, नागपुर सकाळी 10, औरंगाबाद सकाळी 5.30, दु. 2.30.  शेगांव आगार येथून अकोला दर अर्ध्या तासाला विना वाहक, चंद्रपुर सकाळी 9, शिर्डी सकाळी 9.15, पुणे सकाळी 7, पंढरपुर सकाळी 7.30, नागपुर सकाळी 10.30, यवतमाळ दु. 1.15, औरंगाबाद सकाळी 6.15 व 8.30 वाजता .

Post Top Ad

-->