कोरोना संसर्ग सुरक्षीतता पाळून महामंडळाची प्रवाशी वाहतूक सुरू
प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : जिल्ह्यात कोविड-19 च्या संकटात आंतरजिल्हा प्रवाशी वाहतुक दि. 20 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यात आली आहे. सदर प्रवाशी सेवा कोरोना संसर्ग सुरक्षीततेचे सर्व नियम पाळून सुरू राहणार आहे. अशा सुरक्षीत सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्कचा वापर करुन सामाजिक अंतर ठेवून प्रवास करावा असे आवाहन विभाग नियंत्रक तसेच विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे.
एस. टी महामंडळ आता सज्ज झाले असून आपल्या सुरक्षित प्रवास, सामाजिक अंतर ठेवून बसेस निर्जंतुकीकरण करुन माहे जानेवारी 2020 मध्ये जे प्रवास भाडे होते, त्याच प्रवास भाडे दरामध्ये प्रवासी वाहतूक सेवा सुरू राहणार आहे. अधिक माहिती करीता विभागीय नियंत्रण कक्षाशी अथवा संबंधित आगार व्यवस्थापकांशी थेट संपर्क साधावा. नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी बुलडाणा आगार 07262-242788, चिखली 07264-242084, खामगाव 07263-252224, मेहकर 07268 -224554, मलकापूर 07267-222170, जळगांव जामोद 07266-221453, शेगांव 07265-252028 असे
आहे. तरी या सुरक्षीत प्रवाशी सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.