वाशिम-:नेहमी समाजाच्या हिताकरीता ओळखल्या जाणाऱ्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मागील सरकारने ज्या प्रमाणे टिकवून ठेवला त्या प्रमाणेच या सरकारने हि सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवावा व आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्या जावा या अपेक्षेपूर्ती करीता आज दि.६ आॕगष्ट रोजी जिल्हाधिकारी वाशिम कार्यालय येथे जिल्हाधिकार्यांना आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शिवसंग्राम वाशिम जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत सुधिर गोळे यांच्या कडून निवेदन देण्यात आले व यामध्ये हे निवेदन फक्त आमच्या समस्या व अपेक्क्षे कडे लक्ष वेधन्यासाठी देत आहोत ,जर याची दखल घेतल्या नाही गेली तर मराठा समाज या नंतर तीव्र आंदोलन छेडेल असा ईशारा हि या वेळेस शिवसंग्राम चे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत सुधिर गोळे यांच्या कडून देण्यात आला.
या वेळी शिवसंग्राम जिल्हाअध्यक्ष प्रशांत गोळे जेष्ठ नेते प्रदीप कुटे विध्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष विवेकराव देशमुख युवक आघाडी जिल्हाअध्यक्ष स्वप्नील वाघ युवक आघाडी संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर दांदडे जिल्हा संघटक माणिकराव गालट जिल्हा सरचिटणीस रश्मी गायकी युवक शहर अध्यक्ष रुपेश तायडे अनिल शिंदे भरत पोधाडे शुभम शिंदे अशोक खडसे इत्यादी उपस्थित होते.