सिंदखेड राजा येथील शिवाजीनगर टी पॉइंटवर वर राहणाऱ्या अनिकेत दिनकर चव्हाण व मनीषा दिनकर चव्हाण हे बहिण-भाऊ आपल्या चुलत भावाला गौतम उबाळे यांना राखी बांधून जिजामाता नगर येथुन सांयकाळी ६.३० च्या सुमारास परत येताना,जिजामाता नगर ते टी पॉईंट या रस्त्यावर तीन चोरट्यांनी स्कुटी अडवून अनिकेतला मारहाण केली व बहिणीच्या गळ्यावर चाकूने ठेवून तिच्या गळ्यातील ३ ग्रॅमची किंमत १२ हजार रुपयांची चैन काढून देण्यास सांगितली.परंतु सोन्याची चैन देण्यास विरोध केल्याने बाजुला असलेले ३ जण तीन फुटाची लांब तलवार घेऊन आले व चाकूचा धाक दाखवून मारहाण करत मनीषा यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व व पिवळ्या रंगाची कुट्टी एम एच २८ बी सी ९१३४ ही गाडी चोरट्यांनी हिसकावून घेतली व गाडीसह त्याठिकाणा वरून पळ काढला, घटनेची माहिती मिळतात सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयवंत सातव, पोलीस उपनिरीक्षक राम पारवे ,सुरज काळे , शैलेश पवार, यांनी तत्काळ आपल्या तपासाची चक्र फिरवले व ४ तासा मध्ये दोन आरोपींना मुद्देमालासह गजाआड केले. त्यामध्ये निलेश संजय उर्फ मनोहर पवार वय २० वर्ष व विशाल जबरू पवार वय २१ वर्ष राहणार सिंदखेड राजा यांना अटक करण्यात आली आहे त्याच्यावर अप क्रमांक १५३/२० कलम ३९५, ३४१ भादवि सह कलम ४,२५ आर्म एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास ठाणेदार जयवंत सातव करत आहे.
सिंदखेड राजा शहरांतील अनिकेत चव्हाण व मनीषा चव्हाण हे बहिण भाऊ तारीख ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी स्कुटीवर जिजामाता नगर टी पॉईंट घराकडे जात असताना चोरट्यांनी मनीषाच्या गळ्याला चाकु लावुन गळ्यातील चैन व स्कुटी पळवली सिंदखेड राजा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ४ तासामध्ये मुद्देमालासह २ आरोपीस अटक केले आहेत. आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम सिंदखेड राजा पोलीस करीत आहे