जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या वाशिम शहरातील पतंजली चिकित्सालय परिसरातील १, शिवप्रताप नगर येथील १, कोल्ही येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, शिरसाळा येथील १४, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, बायपास रोड परिसरातील २, भारतीपुरा येथील १, सोहळ येथील २, भिलडोंगर येथील १, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, चिचांबाभर येथील २ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आणखी ४९ कोरोना बाधित
वाशिम शहरातील चामुंडादेवी मंदिर परिसरातील ५, गुरुवार बाजार परिसरातील १, कोल्हटकरवाडी परिसरातील ३, लाखाळा परिसरातील ८, काळे फाईल परिसरातील १, वारा जहांगीर येथील ६, मंगरूळपीर शहरातील हरिकृपा कॉलनी परिसरातील १, लाठी येथील १, शेलूबाजार येथील ३, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, येवती येथील १, धोडप बोडखे येथील ३, मंगरूळपीर तालुक्यातील शिरपूर जैन येथील ८, दुधाळा येथील ३, मानोरा तालुक्यातील आसोला खु. येथील २, उमरी बु. येथील १, कारंजा लाड तालुक्यातील शेवती येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या वाशिम तालुक्यातील ढिल्ली येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा काल, २२ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच नागपूर येथे कोरोना बाधित आढळून आल्यानंतर उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या मंगरूळपीर तालुक्यातील लाठी येथील ६० वर्षीय व्यक्तीचाही काल, २२ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह –१४३१
ऍक्टिव्ह – ३७८
डिस्चार्ज – १०२६
मृत्यू – २६ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)