मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मौजे शिरोडा वेळागर (जि. सिंधुदूर्ग) येथील जमीन हस्तांतरण करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या प्रकल्पामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यात देशी व परदेशी पर्यटक आकर्षित होतील तसेच रोजगार निर्मिती व जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. याबरोबरच ताडोबा परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग व थ्रायव्हींग हॉटेल्स प्रा. लि. यांच्यामध्येही सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर उपस्थित होते.