जिल्ह्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यु - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, September 28, 2020

जिल्ह्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यु


128 जणांना सुट्टी ; 85 नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 85 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 128 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्या चार जणांमध्ये दिग्रस शहरातील 49 वर्षीय महिला आणि तालुक्यातील 77 वर्षीय महिला तसेच राळेगाव शहरातील 89 वर्षीय आणि घाटंजी शहरातील 61 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 85 जणांमध्ये 48 पुरुष तर 37 महिला आहेत. यात आर्णी शहरातील चार पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील 11 पुरुष व सहा महिला, घाटंजी शहरातील दोन पुरुष, कळंब शहरातील सहा पुरुष व दोन महिला, महागाव शहरातील तीन पुरुष व एक महिला, नेर शहरातील तीन पुरुष व सहा महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष व सात महिला, उमरखेड शहरातील तीन पुरुष व आठ महिला, वणी शहरातील दोन महिला, यवतमाळ शहरातील 13 पुरुष व चार महिला आणि यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष पॉझेटिव्ह आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 556 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 500 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8276 झाली आहे. यापैकी 6966 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण मृत्युंची संख्या 254 झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 271 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 73719 नमुने पाठविले असून यापैकी 72675 प्राप्त तर 1044 अप्राप्त आहेत. तसेच 64399 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Post Top Ad

-->