(दि. २८ सप्टेंबर २०२०, वाशिम : ) काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील २, काळे फाईल येथील २, गणेशपेठ येथील १, लाखाळा येथील ३, जैन मंदिर परिसरातील १, अकोला नाका परिसरातील १, बसस्थानक परिसरातील १, मोहजा रोड येथील १, कार्ली येथील १, मालेगाव शहरातील ८, मैराळडोह येथील १, इराळा येथील १, मारसूळ येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील १, एकता नगर येथील १, शासकीय रुग्णालय परिसरातील २, सिव्हील लाईन परिसरातील २, अनंत कॉलनी परिसरातील ५, शहरातील इतर ठिकाणचा १, लोणी फाटा येथील १, देगाव येथील ३, हराळ येथील १, रिठद येथील १, लोणी येथील २, व्याड येथील २, मंगरूळपीर तालुक्यातील सार्सी येथील १, कारंजा लाड शहरातील महसूल कॉलनी परिसरातील १, इतर ठिकाणचा १, धनज बु. येथील १, खेर्डा बु. येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ७९ व्यक्तींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच *जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली असून यामध्ये वाशिम तालुक्यातील काटा येथील ६० वर्षीय व रिसोड येथील ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.*
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४१७४
ऍक्टिव्ह – ६७४
डिस्चार्ज – ३४१४
मृत्यू – ८५
इतर कारणाने मृत्यू - १
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)