जिल्ह्यात आज दिवसभरात 159 चाचण्या, 16 पॉझिटिव्ह - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, September 26, 2020

जिल्ह्यात आज दिवसभरात 159 चाचण्या, 16 पॉझिटिव्ह


अकोला,दि. 26 (जिमाका)
- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 159 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोट, पातूर व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. अकोला ग्रामिण येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बाळापूर येथे एक चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे 11 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 46 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 64 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 28 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 159 चाचण्यांमध्ये 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 16800 चाचण्या झाल्या त्यात 1143 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Post Top Ad

-->