जिल्हयात 55 जण कोरानामुक्त, तर नवीन 44 कोरोना बाधित - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, September 26, 2020

जिल्हयात 55 जण कोरानामुक्त, तर नवीन 44 कोरोना बाधित


कोरोनामुळे घोट येथील 30 वर्षीय तरूणाचा मृत्यू

दि.26 सप्टेंबर : एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 55 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोलीमधील 31 जणांचा समावेश आहे. इतर तालुक्यात अहेरी 1, आरमोरी 3, भामरागड 3, चामोर्शी 3, धानोरा 3, मुलचेरा 3, सिरोंचा 1 व वडसा 7 जणांचा समावेश आहे.
तर नवीन 44 बाधितांमध्ये गडचिरोली 13, अहेरी 6, आरमोरी 9, चामोर्शी 7, कोरची 3, कुरखेडा 2 व वडसा 3 जणांचा समावेश आहे. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 612 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2419 रूग्णांपैकी 1791 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे. चामोर्शी तालुक्यातील घोट येथील 30 वर्षीय तरूणाचा कोरोनामूळे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
आजच्या नवीन 44 कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली 13 यात नवेगाव 3, सर्वोदया वार्ड 2, कॅम्प एरिया 2, आशिर्वादनगर 1, कारगिल चौक 1, मार्काबेादी 1, आयोध्यानगर 2, चामोर्शी रस्ता 2 रूग्णांचा समावेश आहे. अहेरी 6 यात शहरातील 4 तर महागाव व आलापल्ली एक-एक, आरमोरी 9 यात शहरातील 8 तर सायगाव 1. चामोर्शी 7 यात वाघधरा 3, शहर 3 आणि रेखेगाव 1. कोरची 3, कुरखेडामधील 2 यात शहर 1 व चारबत्ती 1. वडसामधील 3 मध्ये विसोरा 1, शिवाजी वार्ड 1 हनुमान नगर 1 यांचा समावेश आहे.

Post Top Ad

-->