जिल्ह्यात 62 पॉझिटीव्ह, 191 डिस्चार्ज, चार मयत - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, September 25, 2020

जिल्ह्यात 62 पॉझिटीव्ह, 191 डिस्चार्ज, चार मयत


अकोला,दि.25(जिमाका)-
आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 304 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 242 अहवाल निगेटीव्ह तर 62 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज दोन मयत झाले.

त्याच प्रमाणे काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 18 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7004(5763+1086+155) झाली आहे. आज दिवसभरात 191 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 37267 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 36315, फेरतपासणीचे 204 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 748 नमुने होते. आजपर्यंत एकूण 36584 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 30821 तर पॉझिटीव्ह अहवाल 7004(5763+1086+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 62 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 62 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 12 महिला व 25 पुरुष आहे. त्यात जीएमसी येथील सहा जण, मुर्तिजापूर येथील पाच जण, डाबकी रोड, कौलखेड, अकोट येथील प्रत्येकी तीन जण, सिरसो ता.मुर्तिजापूर, चोहट्टा बाजार, जऊळका येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित लहान उमरी, वाशिम बायपास, न्यु खेतान नगर, मोठी उमरी, जूने शहर, गोकूल कॉलनी, तापडीया नगर, सिंधी कॅम्प, अकोली जहागीर, बोर्डी ता. अकोट व करोडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात नऊ महिला व 16 पुरुष आहे. त्यातील बार्शीटाकळी व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी चार जण, चिंचोली रुद्रायणी, मुर्तिजापूर व एलआयसी क्वॉटर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित परसोबढे, सोनखेड, वानखडे नगर, बोरगाव मंजू, चांदूर, रामनगर, सिंधी कॅम्प, तापडीया नगर, वाशिम बायपास, उमरी व फिटे प्लॉट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 18 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
चार मयत
दरम्यान आज चार जणांचे मृत्यू झाले. त्यातील वाशिम बायपास, अकोला येथील 75 वर्षीय महिला असून ती 24 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, मुर्तिजापूर येथील 40 वर्षीय पुरुष असून ते 23 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, पाथर्डी ता. तेल्हारा येथील 70 वर्षीय महिला असून ती 15 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर डाबकी रोड, अकोला येथील 50 वर्षीय महिला असून ती 21 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.
191 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 59 जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून सहा जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, युनिक हॉस्पीटल येथून चार जण, आर्युवेदीक महाविद्यालय येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून चार जण व कोविड केअर सेंटर, बाळापूर येथून चार जणांना डिस्चार्ज देण्यात आले. तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला अशा 110 जणांना अशा एकूण 191 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
1448 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7004(5763+1086+155) आहे. त्यातील 221 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 5335 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1448 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Post Top Ad

-->