जिल्ह्यात आणखी ४९ कोरोना बाधित; १२४ जणांना डिस्चार्ज - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, September 25, 2020

जिल्ह्यात आणखी ४९ कोरोना बाधित; १२४ जणांना डिस्चार्ज


(दि. २५ सप्टेंबर २०२०, सायं. ६.०० वा
वाशिम .
) काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १, शृंगऋषी कॉलनी परिसरातील १, नवीन आययुडीपी येथील १, चामुंडादेवी परिसरातील ३, साईलीला नगर येथील १, नवीन पोलीस वसाहत परिसरातील ३, विनायक नगर परिसरातील ४, पाटणी चौक परिसरातील १, शुक्रवार पेठ परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, पोस्ट ऑफिस जवळील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ४, तामसी येथील १, केकतउमरा येथील २, शेलगाव येथील १, काटा येथील १, रिसोड शहरातील पॉवर हाऊस परिसरातील १, अनंत कॉलनी परिसरातील ४, सिव्हील लाईन्स येथील १, सोनाटी येथील ३, आसेगाव पेन येथील १, गणेशपूर येथील १, व्याड येथील १, बेलखेडा येथील २, मालेगाव तालुक्यातील इराळा येथील १, कारंजा लाड शहरातील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १२४ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच *उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या वाशिम शहरातील दोन महिला व पिंप्री वरघट येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना विषयक अहवाल काल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच कुराळा येथील ५० वर्षीय व अमानी ६० वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.*
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ३९३५
ऍक्टिव्ह – ७७१
डिस्चार्ज – ३०८१
मृत्यू – ८२
इतर कारणाने मृत्यू - १
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

Post Top Ad

-->