शिराळा-पुसदा मार्गावर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, September 28, 2020

शिराळा-पुसदा मार्गावर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू


अमरावती - 
अमरावती शहरापासून जवळच असणाऱ्या शिराळा-पुसदा मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी दोन दुचाकींचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, तीन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सुमारे साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. वसंत जाधव (52), राज गायकवाड (30) आणि गौतम वानखडे (36) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.

चांदुर बाजार पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल असणारे वसंत जाधव हे चांदूरबाजार येथून आपल्या दुचाकीने अमरावतीला जात होते. यावेळी पुसदा गावालगत मंगेश अजमिरे यांच्या शेताजवळ विरुद्ध दिशेने राज गायकवाड आणि गौतम वानखडे यांची दुचाकी आली. यावेळी दोन्ही दुचाकी एकमेकीवर आढळल्या. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकींवर स्वार तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वळगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून तिघांचाही मृतदेह शविच्छेदनासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. राज गायकवाड आणि गौतम वानखडे हे दोघेही पुसदा गावचे रहिवासी होते. या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल दगावल्याने पोलीस प्रशासन दलातही हळहळ व्यक्त होत आहे.

Post Top Ad

-->