नागपूर - बाल्या बिनेकर हत्याकांड प्रकरणातील तीन आरोपींच्या नागपूर पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या 24 तासाच्या आतचमुसक्या आवळल्या. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या खून प्रकरणाचा सीसीटीव्ही शहरभर व्हायरल झाला होता. स्थानिक सीताबर्डी पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकही आरोपींच्या शोधत होते.
आरोपी रामटेकच्या दिशेने पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळली होती. त्यानुसार पोलिसांनी ठावठिकाणा कळताच तिघांना ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये मुख्य आरोपी चेतन हजारेचा समावेश आहे. चेतन हजारे याने जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी पाच साथीदारांच्या मदतीने बाल्या बिनेकरचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
शनिवारी (दि. 26 सप्टे.) भर दिवसा सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोले पेट्रोलपंप चौकातील वाहतूक सिग्नलवर फिल्मी स्टाईलने बाल्या बिनेकरचा खून करण्यात आला होता. घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हत कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पाठवून त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर अवघ्या काही तासात आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. मृत बाल्या हा सावजी भोजनालयासह जुगार अड्डा चालवात होता. त्याच्या विविध गुन्हे दाखल होते. सध्या पोलिसांनी मुख्य आरोपी सह तिघांना अटक केली आहे