एकीकडे कोरोना प्रादुर्भाव तर दुसरीकडे शेतकऱ्यावर आस्मानी मार तेव्हा अडचणीत सापडलेल्या सापडलेल्या शेतकऱ्यास त्वरित आर्थिक मदत द्या अशी मागणी डोणगाव येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
डोणगाव : सध्या करुणा प्रादुर्भाव सुरू असल्याने शेतकऱ्यांनी व शहरात कंपन्या मध्ये नोकरी असलेल्या शेतकरी पुत्रांनी आपले लक्ष शेतीवर केंद्रित केले दरवर्षीपेक्षा या वर्षी पिकेही जोमात होती मात्र अति पावसाने पहिले उडीद मुंगावर आपला अवकृपा आणली व त्या नंतर उभ्या सोयाबीन पिकाला कोंब फुटायला लागले त्यावर शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्या संबंधी एक निवेदन डोणगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री यांना पाठविले.
सध्या परिसरात सोयाबीन काढण्यापूर्वी उभ्या सोयाबीन वर ट्रॅक्टर फिरवायची वेळ आलेली आहे एकीकडे दरवर्षीपेक्षा यावर्षी शेतकऱ्यांनी व शेतकरी पुत्रांनी शेतीवर आपले लक्ष केंद्रित केले जे युवक शहरात नोकरीवर होते त्यांनी घरच्या शेतीवर मेहनत करायला सुरुवात केली पिके सुद्धा बहरली अशातच जास्त पावसाने मुग उडीद घरी आणायचे कामच पडले नाही जागेवरच सडून गेले तेव्हा सर्व आशा सोयाबीनवर मात्र त्या फोल ठरण्याची वेळ आली उभ्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब यायला लागले ज्याने हातात आलेले पीक हातातून जात असल्याचे दिसून येत आहे याची पाहणी माजी प्रत्येक्ष शेतात जाऊन राज्यमंत्री सुबोध सावजी सह माजी सरपंच संजय पाटील आखाडे व शेतकऱ्यांनी केली आणि यावर परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री यांना एक निवेदन पाठवून त्यात दोनगाव परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या अशी मागणी केली या निवेदनावर शैलेश सावजी ,संजय ,पाटील आखाडे ,लक्ष्मण पादरे ,शेख वसीम बागवान,शेक सलीम,दत्ता काळे,संदीप पांडव,बळीराम पांडव,वसंतराव मांवतकर,सुभाष अवधूत सह शेकडो शेतकऱ्याच्या सह्या आहेत.